HeadMaster Message

HeadMaster Message

आण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूचा मुख्याध्यापक या नात्याने आपणाशी संवाद साधण्याचा जो योग आला, त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. ज्ञान व सुसंस्कार या द्येयाने प्रेरित होऊन व शैक्षणिक प्रगतीचाध्यास घेऊन शाळेची स्थापना झाली. शिक्षण हे सर्वांगीण विकासाच्या क्रांतीचे अस्त्र आहे. शिक्षण ही जीवनाची गरज आहे.
                विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ध्यास घेतलेल्या आमच्या विद्यालयात शालेय, त्याचबरोबर सहशालेय उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जातात. सहशालेय उपक्रमामध्ये हस्ताक्षर सुधार सप्ताह, वर्षातून दोनदा ग्रंथ प्रदर्शन, सामान्यज्ञान चाचणी, ज्ञानरचनावादी, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व उपयोग, वृक्षाबंधन, पालक मिटिंग, विद्यार्थी व शिक्षक वाढदिवस व मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेच्या ध्वजाचे ध्वजारोहण, दररोज, परिपाठावेळी प्रश्नमंजुषा, तारीख वार पाढे, हिंदी व इंग्रजी चार शब्द दररोज, लोकनृत्य स्पर्धा, ग्रंथालयाचा वापर (ऑफ तासाला ट्रे), गट चर्चा प्रकल्प, शालेय, क्रीडा स्पर्धा, १० वी विविध वर्तमान पत्रे , लेख वाचन, तज्ञ मार्गदर्शन, अप्रगत मुलांसाठी ज्यादा अध्ययन, गृह कार्य उपक्रम प्रकल्प, संयोजन, विद्यार्थी समुपदेशन, आदर्श उत्तरपत्रिका प्रश्नपेढी, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, शिक्षक -विद्यार्थी पुस्तक परिचय, सारांश आशय, सुचना अभिप्राय नोंद वही, भाषा, गणित-विज्ञान, सामाजिक-शास्त्रे, दिवस साजरे करणे, वनऔषधी वृक्ष, सचित्र अहवाल, पेपर मधील बातमी वृत्तवेध, अहवाल, सांस्कृतिक सचित्र अहवाल, माजी विद्यार्थी मेळावा इत्यादी उपक्रम घेतले जातात. त्याचबरोबर भावी काळातील प्रशासकीय परीक्षेच्या दृष्टीने UPSC MPSC ची तयारी याबाबत मार्गदर्शन केले जाते. इ. ५ वी व ८ वी च्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्षासह तज्ञ मार्गदर्शन व प्रशिक्षित शिक्षकांची सोय उपलब्ध केली आहे. विद्यालयाचा इयत्ता १० वी व १२ वी चा निकाल १००% लागावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नरत आहोत .
                राष्ट्रीय बालविज्ञान प्रकल्पामध्ये राजस्तरीय स्पर्धेत प्रकल्प सादरीकरणामध्ये मध्यान्ह भोजनातील शिल्लक राहिलेल्या अन्नाचे प्राण्यांच्या पौष्ठिक खाद्यान्नात रूपांतर करणे. याला सुजल भगत इ. ८ वी, संकेत जाधव इ.७ वी यांना राज्यस्तरीय विशेष प्राविण्य पुरस्कार मिळाला त्याचबरोबर सामाजिक बांधीलकी म्हणून आम्ही अगदी विद्यार्थी व पालकांसाठी इकोफ्रेंडली गणपती व इकोफ्रेंडली दिवाळी या स्पर्धांचे आम्ही आयोजन केले होते.
                संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा .अण्णासाहेब डांगे (आप्पा), सचिव मा . चिमणभाऊ डांगे, संचालक विश्वनाथ डांगे, व्यवस्थापक सुनील शिणगारे सर , विद्यालयाचे प्राचार्य सुभाष पाटील सर व शाळेचे सर्व विद्यार्थी, पालक , शिक्षक या शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे या कामी सहकार्य व मार्गदर्शन लाभले, त्याबद्दल या सर्वांचे मनपूर्वक आभार....


श्री. महेश शांताराम जाधव

M.A.B.Ed.

(मुख्याध्यापक )