संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर संचलित,

मा. अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल (सैनिकी पॅटर्न) अँड ज्युनिअर कॉलेज, आष्टा

ता. वाळवा, जि. सांगली

इयत्ता ५ वी ते १० वी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम, ११ वी १२ वी (विज्ञान शाखा) निवासी व अनिवासी शाळा

संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर संचलित,

मा. अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल (सैनिकी पॅटर्न) अँड ज्युनिअर कॉलेज, आष्टा

ता. वाळवा, जि. सांगली

इयत्ता ५ वी ते १० वी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम, ११ वी १२ वी (विज्ञान शाखा) निवासी व अनिवासी शाळा

संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर संचलित,

मा. अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल (सैनिकी पॅटर्न) अँड ज्युनिअर कॉलेज, आष्टा

ता. वाळवा, जि. सांगली

इयत्ता ५ वी ते १० वी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम, ११ वी १२ वी (विज्ञान शाखा) निवासी व अनिवासी शाळा

About Annasaheb Dange Public School (Sainiki Pattern), Ashta

१५ जून २००२ मध्ये अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल ने आपला प्रवास सुरू केला. अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल हे आजच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रातील राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा अभ्यासक्रम अंगीकृत असणारी कायम विनाअनुदानित माध्यमिक स्तरातील पहिली आय. एस. ओ. -९००१:२०१५ ने मानांकित शाळा झाली आहे. सांगली जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित माध्यमिक विभाग स्तरावरील पहिली आंतरराष्ट्रीय प्रमाणित शाळा म्हणून दि. ०७/०३/२०१८ रोजी आय. एस. ओ. -९००१:२०१५ ने विद्यालयाला पुर्नमुल्यांकन करण्यात आले.

शाळेची वैशिष्ट्ये:

  • प्रत्येक वर्गात स्वतंत्र डिजीटल क्लासरूमची सोय.
  • अतिशय भव्य मैदान व शैक्षणिक इमारतींनी गजबजलेला परिसर.
  • सर्व मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष.
  • गुणवत्ता वाढीबरोबर सुसंस्कार मुल्ये रुजवणे.
  • सैनिकी पॅटर्नची नियोजनपूर्वक अंमलबजावणी.
  • देशी-विदेशी खेळांचे विशेष प्रशिक्षण.
Learn More

क्रीडा विभाग

मल्लखांब

मल्लखांब हा भारतीय खेळ असून सर्व आखाडे आणि व्यायामशाळेमध्ये खेळला जातो.

कुस्ती

बल उपासनेसाठी कुस्ती या खेळाला महत्व प्राप्त झालेले आहे. हा एक लोकप्रिय खेळ खेळला जातो.

बॉक्सिंग

भारतात व जगात बॉक्सिंग हा लोकप्रिय खेळ आहे. कुस्तीप्रमाणे हा ही खेळ ताकदीचा आहे.

किक बॉक्सिंग

किक बॉक्सिंग हा खेळ बॉक्सिंग व कराटे यांचा समावेश होऊन हा खेळ तयार झालेला आहे.

व्हॉलीबॉल

व्हॉलीबॉल हा अमेरिकन विलियम मार्गन यांचे जनकत्व झालेला एक सांघिक खेळ आहे.

कब्बड्डी

कब्बड्डी हा एक आक्रमक आणि वेगवान खेळ आहे. हा रग्बी आणि कुस्ती यांचे मिश्रणच वाटते.

योगासन

योगासन हा मानवाच्या शारीरिक, नैतिक व आध्यत्मिक स्वास्थाचा मार्ग दाखवणारी विद्या आहे.

वुशु

वुशु हा खेळ बॉक्सिंग, कुस्ती व कराटे या तिन्ही खेळाचा यामध्ये एकत्र समावेश केला जातो.

हॉकी

हॉकी हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो.

खो-खो

खो-खो हा महाराष्ट्रात अधिक लोकप्रिय आहे. हा खेळ खुल्या मातीच्या मैदानात खेळतात.

ज्युदो

ज्युदो हा आव्हानात्मक क्रीडाप्रकार शस्त्राविना खेळला जातो.

तायक्कॉदो

तायक्कॉदो ह्या खेळामध्ये हात, पाय व टेक्निकचा वापर केला जातो.

बास्केटबॉल

बास्केटबॉल हा अमेरिकन जनकत्व लाभलेला व जगप्रसिद्ध असलेला अतिशय वेगवान व रोमांचक खेळ आहे

कराते-डो(कराटे)

कराते-डो(कराटे) म्हणजे क-रिकामे, रा-हाताच्या साहाय्याने, ते-बचाव करणे, डो-पुन्हा वार करणे.

वेटलिफ्टींग / पॉवर लिफ्टींग

वेटलिफ्टींग / पॉवर लिफ्टींग हा भक्कम ताकदीचा खरा पुरावा आहे. जेथे शक्तीचा वापर केला जातो.

आमचे कर्तव्य

1

श्रमास प्रतिष्ठा, मनाची श्रीमंती व संघटीत शक्तीवर विश्वास हे विदयार्थ्यांवर बिबवले जाईल. एवढे सांगण्याचे कारण एकच, ते म्हणजे आम्ही आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवून आणू इच्छितो. त्याच्याच नेतृत्व गुणांचे संवर्धन करून तो एक आदर्श व श्रेष्ठ नागरिक झाल्याचे पाहू इच्छितो. आपण निर्णय घ्या, आम्ही आपल्या पाल्याची वाट पाहत आहोत.

2

दुधाची भाषा मराठी, देशाची भाषा हिंदी व जगाची भाषा इंग्रजी या तिन्ही भाषा शिकविल्या जातील. परंतु अधिक भर इंग्रजी भाषेवर राहील. इंग्रजी बोलता आले नाही तर जगात मुक्याचे जीवन जगावे लागेल. तुमचा पाल्य १० वी पास होईपर्यंत फाडफाड इंग्रजी बोलला पाहिजे यावर भर राहील.

3

मुलांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक व अध्यात्मिक वाढ होईल याकडे लक्ष.

4

विनय, स्वाभिमान, आत्मविश्वास, निर्णयशक्ती, समरसता या वृत्ती वाढीस लागाव्यात यासाठी प्रयत्न.

5

नृत्य, गायन, संगीत या कलागुणांना चालना, चित्रकला, हस्तकला यांना उत्तेजन, बैठे (इनडोअर) व मैदानी खेळांचा सराव करून घेतला जाईल. "संस्कारशून्य शिक्षण माणसाला पशु बनवते. संस्कारयुक्त शिक्षण माणसाला देवत्व प्राप्त करून देते. " या तत्वानुसार मा. अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूलमध्ये शिकणारी मुले सुसंस्कारित होतील.

6

पळणे, धावणे, उंच उडी, भालाफेक, गोळाफेक, नेमबाजी (रायफल शूटिंग) हे मैदानी शिक्षण, मर्दानी खेळ, सामुदायिक कवायत, मल्लखांब, कराटे, प्राणायम, योग व परिपाठ याद्वारे विद्यार्थ्यांना सदृढ व निरोगी बनवणे.

7

माध्यमिक, उच्च माध्यमिक (११ वी, १२ वी सायन्स) व इंग्लिश मेडियम, इंजिनिअरिंग, मेडिकल, D.Ed.,B.Ed.,M.Ed.,ITI ,नर्सिंग,D-Pharmacy, B-Pharmacy, Driving School, लेडीज हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल, जिमखाना, आश्रमशाळा, प्रशस्त ग्रंथालय एकाच शैक्षणिक संकुलामध्ये या सर्व सुविधा उपलब्ध.